बदलापूर

बदलापूरमध्ये प्रविण राऊत स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान

बदलापूर, दि. ५,प्रतिनिधी:बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकाचे एक पद रिक्त झाले होते. यापूर्वी भाजपकडून शागोफ गोरे व तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले होते. मात्र वादंग निर्माण झाल्यानंतर तुषार आपटे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने एक पद रिक्त झाले होते….

न्यायालयीन निर्देशानुसार; बदलापूरमध्ये नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दाखल

बदलापूर, दि.५,प्रतिनिधी:बदलापूरमधील सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली.याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे बदलापूर नगरपरिषदेमध्ये आले होते.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी…

बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवरील तोडक कारवाईस तूर्तास स्थगिती;भाजप नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:बदलापूर शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील तोडक कारवाईमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. व्यावसायिकांना आपले सामान हलविण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी पुढील ८ दिवस तोडक कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी बांधकाम सभापती रमेश सोळसे यांनी भाजप नगरसेवकांच्या…

बदलापूर नगरपरिषदेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

बदलापूर, दि.३, प्रतिनिधी:बदलापूर शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी बदलापूर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला असून ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. आज दि.३ रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा दुसरा दिवस असून शहरातील मोहन पाम परिसर, पनवेल हायवे तसेच अंबरनाथ–बदलापूर रस्ता,…

बदलापूरमध्ये नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

बदलापूर, दि.२,प्रतिनिधी,बदलापूरमध्ये मागील काही वर्षांत नियमनाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात नगरपरिषदेला चांगलेच फटकारले आणि कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे बदलापूर नगरपरिषदेनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार…

बदलापूर

बदलापूरमध्ये काळ्या काचा,सिग्नल उल्लंघन,दुतर्फा पार्किंग,कोंडी…! वाहतूकीचे नियम धाब्यावर

बदलापूर, दि.३०,प्रतिनिधी:वाहनांवर काळ्या काचांना बंदी असताना, मात्र बदलापूरमध्ये अनेक गाड्यांना काळ्या काचा,फिती वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांकडे वाहतूक विभाग आणि पोलीस का बरं डोळेझाक करत आहेत. लहान सर्वसामान्य वाहनचालकांना नियम लावले जातात.मात्र दिग्गजांना सूट का ?असा असा सवाल उपस्थित…

बदलापूर शहरासाठी स्वतंत्र धरणांची आखणी;बदलापूरकरांची पाणी समस्या सुटणार

बदलापूर, दि.२९,प्रतिनिधी:बदलापूर शहरातील वाढत्या पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तीन स्वतंत्र धरणांची आखणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नंबरवाडी, इंदगाव आणि चिंचवली या परिसरात नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव असून, प्रत्येक धरणातून अंदाजे ५० ते…

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेसाठी अभिमानाचा क्षण! अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना ‘राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक’

बदलापूर,दि.२७,प्रतिनिधी,कुळगांव बदलापूर नगरपरिषद अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी मा. श्री. दामोदर वांगड यांना देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक’ पुरस्कार देण्यात आले आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना त्यांच्या उत्कृष्ट, धाडसी व समाजोपयोगी सेवेसाठी…

मलनिस्सारण व्यवस्थेस गती; कुळगांव–बदलापूर नगरपरिषदेस दोन अत्याधुनिक वाहने प्राप्त

बदलापूर, दि.२५,प्रतिनिधी:कुळगांव बदलापूर शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या १८.५ टन क्षमतेच्या सक्शन कम जेटिंग विथ वॉटर रीसायकलिंग यंत्राच्या दोन अत्याधुनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा रविवार,दि २५ जाने. रोजी मोठ्या उत्साहात पार पडला….

बदलापूरच्या ‘त्या’ नराधमानंतर सरकारचा मोठा दणका! बालकांच्या सुरक्षेसाठी नवा ‘ब्रह्मास्त्र’ कायदा; आता शाळांची खैर नाही!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मसुदा अंतिम टप्प्यात मुंबई | विशेष प्रतिनिधी:बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या संतापाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता बालकांच्या सुरक्षेसाठी एक अभेद्य ‘कायदेशीर कवच’…