कुठे शिवराय, कुठे टिपू
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेहमीच जनतेच्या प्रश्नावर बोलतात. त्यांच्या मागे चौकशीचे कोणतेही शुल्काष्टक नाही, कोणत्याही बँकेचे कर्ज घेऊन त्यांनी संस्था उभ्या केलेल्या नाहीत. शुद्ध गांधीवादी मार्गाने जाणारा हा कार्यकर्ता आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे आमदार होण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठ गांधीवादी…
नवी विटी, नवा दांडू
आज बांगलादेशच्या निवडणुकीचे निकाल लागले. तिकडे मतदान संपले आणि इकडे मतमोजणी सुरू झाली. असाच प्रकार इंग्लंडमध्येही होतो. मतदान झाल्यावर महिना-महिनाभर वाट पाहायला लावणारी आपली भारतातील मतमोजणीची प्रक्रिया अनेक प्रश्न निर्माण करते. बांगलादेशच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना अनेक बाबी स्पष्ट होत…
बिर्लाजी की जय!
लोकसभेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले ओम बिर्ला यांच्याविरुद्ध संपूर्ण विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडलेला आहे. लोकसभेच्या अध्यक्षाने कोणाबाबतही पक्षपाती असू नये, मग तो सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, असा पायंडा आहे. परंतु हे अध्यक्ष विरोधकांना बोलूच देत नाहीत, पंतप्रधानांच्या…
अमेरिका ताळ्यावर
काल भारत आणि अमेरिका यांच्या करारावर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रकाशित केले. भारताने युरोपियन राष्ट्रांबरोबर करार केला. त्यानंतर ट्रम्प यांनी दादागिरी दाखवत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अमेरिकन शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो भारताने खरेदी करावा असा ट्रम्प यांचा…
ट्रम्पचे तुणतुणे
भारताने थोड्याच दिवसांपूर्वी युरोपीय युनियनबरोबर ट्रेड समझोता केला होता. आतापर्यंत मग्रूरीने वागणार्या अमेरिकेला यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक होते. जाणकार आणि तज्ज्ञ लोक तेव्हाच म्हणत होते की आता अमेरिकेबरोबर आपला व्यापारी करार होणारच होणार. अमेरिकेने आतापर्यंत सव्वा म्हणजे ५० टक्के आयात…
पाकडे,वाकडे ते वाकडेच
पाकिस्तानचा जन्म भारताच्या विभाजनातून झाला. ब्रिटिशांनी पाकिस्तानच्या दोन्ही भागात दोन पाकिस्तान निर्माण केले. पैकी पूर्व भागातील पाकिस्तान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी दंड थोपटून उभा राहिला. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानला बांगलादेश बनवले. इकडील पाकिस्तानच्या अन्यायाविरुद्ध…
सपाट आणि शहरी अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. आपल्यावर जवळजवळ जीडीपीच्या ५६% च्या आसपास कर्ज आहे, हे प्रमाण ५०% पेक्षा आत आणण्याचा निर्धार अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. तो कितपत साध्य होईल हे भविष्याच्या पोटात दडलेले आहे. या अर्थसंकल्पात लोकानुनय करण्यासाठी…
सोने-चांदीची व्यथा
तीन दिवसांपूर्वी चार लाखांपर्यंत गेलेली चांदी आज अडीच लाखांच्या दरम्यान आलेली आहे. तीच परिस्थिती सध्या सोन्याचीही आहे. दोन लाखांच्या जवळपास पोहोचलेली प्रतितोळा सोन्याची किंमत आता दीड लाखाच्याही खाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात दररोज उलथापालथ होत होती…
काँग्रेसचा चंद्रपूरचा तिढा
काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्रामधील चंद्रपुरातील नगरपालिकेत सत्ता स्थापनेचा क्षण अगदी जवळ आला होता. मात्र सत्ता काँग्रेस पक्षाला बहुतेक शनीचा फेरा सुरू आहे कारण हाती आलेल्या यशाला कसे लाथाडावे हे शिकायचे असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्षाचा किंवा सुंदोपसुंदीचा अभ्यास करावा. यापूर्वी…
असेही दादा
(श्रीकृष्ण चांडक)महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर अजित दादा स्वर्गाच्या वाटेने गेले. त्यांची शिस्त, त्यांचा लोकसंग्रह, स्पष्टवक्तेपणा वगैरे वगैरे सर्वांनाच ठाऊक आहे, किंबहुना तो प्रसिद्ध आहे. पण दादा व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांनी कुणाकुणावर कशीकशी माया केली. याची जी काही माहिती आमच्या जवळ…





