वर्धा:नुकतीच वर्धा नगरपरिषद ची निवडणूक संपन्न झाली. शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांची निवड जाहीर झाली. त्यानिमित्ताने जिल्हा शिवसेनेच्या वतीने सुधीर पांगुळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांच्या दालनात सत्कार करण्यात आला.
लोकनियुक्त प्रतिनिधी हा जनतेचा असतो तो कोणत्याही पक्षाचा नसतो. त्यामुळे तो जनतेच्या सत्कारास पात्र ठरतो हिच भावना ठेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांचे नेतृत्वात दि.६ जानेवारी रोजी सत्कार सोहळा पार पडला. यावेळेस नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी शिवसेनेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे नगर विकास मंत्रालय शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कक्षेत असल्याने शहराच्या विकासासाठी शिवसेनेच्या मदतीची गरज भासणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या असता जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी शहराच्या विकासासाठी शिवसेना खंभीरपणे नगराध्यक्ष यांच्या सोबतच असल्याची ग्वाही दिली.
यावेळेस उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक रित्या नगराध्यक्षाचा सत्कार करून अभिनंदन केले.सत्कार प्रसंगी काँग्रेस नेते शेखरबाबू शेंडे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी ठमेकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे,वर्धा विधानसभा क्षेत्राचे तक्रार निवारण समिती प्रमुख सुरेश पट्टेवार,उपजिल्हा प्रमुख मिलन गांधी,कामगार नेते प्रशांत रामटेके,उपशहर प्रमुख मनोजकुमार भूतडा,विनोद जमणारे,शहर समन्वयक वैभव तिजारे,उपशहर प्रमुख संतोष लांगोरे,उपशहर प्रमुख शरद आडे,शहर समन्वयक कान्हा यादव,बाळा थोरात,बादल श्रीवास, सचिन चांडक,रंजना पट्टेवार,धनश्री थोरात,लिना जमणारे,मयुरी गांधी, नाना झिलपे,बाळकृष्ण वाघमारे यांची उपस्थिती होती.




