मुंबई दि. २० प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या आखत्यारीतील आठ शासकीय मुद्रणालयातील कामगारांनी दिनांक २० फेब्रुवारी २० ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रलंबित मागण्यासाठी रोज सकाळच्या सत्रात दोन तास धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुद्रणालयीन पदांचा आढावा २०१७ पासुन प्रलंबित आहे. नवीन सेवाप्रवेश नियम सन १९९६ पासून मंजुर झालेले नाहीत. पदांचा आढावा आणि सेवाप्रवेश नियम मंजुर झाले नसल्याने कामगार भरती ठप्प आहे. एकूण पदांपैकी ४० टक्के पदे रिक्त असून त्याचा प्रचंड ताण कार्यरत कर्मचाऱ्यावर येत आहे.
याबरोबरच मुद्रण भत्त्यात वाढ मिळणे, दुसरा व चौथा शनिवार सुट्टी मिळणे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातून होणारी वसुली थांबवावी हे प्रश्न ही महत्वाचे आहे. विशेषतः या प्रश्नाकरिता दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्याचे उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून दोन महिन्यात प्रश्न सोडवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही उद्योग विभाग आणि संचालक, मुद्रण विभाग यांनी कार्यवाही केली नसल्याने कामगाारमध्ये कमालीची नाराजीची आणि संतापाची भावना आहे. या सर्व प्रश्नांच्या सोवडवणुकीसाठी महाराष्ट्र गर्व्हन्मेंट प्रेसेस एम्लॉईज फेडरेशने आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाई येथील शासकीय मुद्रणालयामधील आज दोन तास धरणे आंदोलन झाले असून आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचा इशारा प्रेसेस फेडरेशने दिला आहे.




