उल्हासनगर

पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शहर विकास मंच करणार आंदोलन

उल्हासनगर , दि . २३ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पाणीपट्टीत भरमसाठ दरवाढ केल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे. महापालिकेने सदरची वाढ त्वरित रद्द करावी.अन्यथा शहर विकास मंच संघटनेच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या गेटला ताला मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मंचाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक राजेश फक्के यांनी महापालिका आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे व महापौर अश्विनी निकम यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
उल्हासनगर शहरात सर्वत्र पाणी टंचाईने कळस गाठला असुन नागरिकांना अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. काही विभागात तर दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही.झालाच तर तो पण कमी दाबाने व अनियमित होतो.विशेष म्हणजे शहरातील प्रभाग क्रमांक 14 व 15 मधील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.सदर प्रभागात अनियमित पाणीपुरवठा नियोजन शुन्य कारभार , पाणी पुरवठ्याची अनियमित वेळापत्रक आणि मोठ्या प्रमाणात पाणी गळती अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदरची समस्या सोडविण्यासाठी अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ह्या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. ही बाब सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे .महापालिकेने सदर प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी.व येत्या 8 दिवसात वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करावी,अन्यथा शहर विकास मंच ह्या संघटनेच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या गेटला ताला मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शहर विकास मंच उल्हासनगरचे अध्यक्ष राजेश फक्के यांनी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे व महापौर अश्विनी निकम यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *