अकोट अकोला जिल्हा

एन.एम. एम.एस. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नेत्र दीपक यश

दिनांक 24फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम. एस. च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण 133 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी 59 विद्यार्थी पास झालेत.अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या व विद्यार्थ्यांचा बौद्धिक कस लागणाऱ्या या परीक्षेत 59 विद्यार्थी पास होणे म्हणजे शाळेचा गौरव, उज्वल भवितव्य, व शाळेचा नावलौकिक वाढवणारी बाब आहे. यावर्षी ही परीक्षा 179 गुणांची राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. यामध्ये 100 च्या वर गुण प्राप्त करणारे एकूण 14 विद्यार्थी आहेत .आणि 90 च्या वर गुण प्राप्त करणारे 16 विद्यार्थी आहेत.

या परीक्षेत पात्र विद्यार्थ्याला 48 हजार रुपये स्कॉलरशिप मिळनार आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या परीक्षेत शाळेतून व तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे कु.तनवी गुजर 138 गुण, द्वितीय कु. आयेशा शहा 129गुण , तृतीय कु. आनंदी रेळे 126 गुण, कु. आनंदी पोंदे 117 , कु. संस्कृति धुळे 117 गुण, कु.श्रावणी ताठे 117 गुण, कु.धनश्री खडे 114 , कु.खुशी थोरात 112 , कु.वैदही गोंडचर 110, स्वरूप मगर 108 , अभय शेगोकार 107, कु.प्राप्ती नाथे 105,कु.मनस्वी कातखेडे104,कु.ईश्वरी भावे 100 गुण.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचे त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. देवानंद बुधवंत प्रा.संदीप बोबडे, प्रा. डॉ. मेघनाताई पोटे, प्रा.डॉ. कीर्ती काळबांडे,श्री दिनेश कुलट प्रा. विधी रावणकार,शुभम रावणकार,कु.स्वाती वसु, कुमारी उपासे,कु. गडेकर,विभाग प्रमुख श्री. शरद पवित्रकार , वर्गशिक्षिका कु. जयश्री बोरसे, श्री संजय गोपनारायण,व समस्त वर्ग 5 ते 7 च्या वर्गाचा पाया रचणारे शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, श्री.संजय तेलगोटे ,श्री. गजानन गव्हणे , श्री. कैलास इनवते या सर्वांचे अभिनंदन केलंयं ते संस्थापक अध्यक्ष मान.श्री भाऊसाहेब पोटे , विद्यमान अध्यक्ष मा. श्री शिरीष पोटे, संस्था सचिव मा. सौ मेघनाताई पोटे,कोषाध्यक्ष मा.श्री प्रवीण पोटे, संस्था संचालक श्री अमोल तळोकार,श्री आर. ए.धांडे व समस्त संचालक मंडळ , प्राचार्य श्री. पी. बी.रावणकार , पर्यवेक्षक श्री. पी. एम. गावंडे या सर्वांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं यां घवघवीत यशाबद्दल व त्यांच्या पालकांचं व सहभागी समस्त शाहू परिवाराचं या नेत्रदिपक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केलेत.असे प्रसिद्धीप्रमुख शिक्षक श्री कन्हैया गौर यांनी कळविले

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *