मुंबई, दि. ६ सांस्कृतिक प्रतिनिधी:भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पं. अजितकुमार कडकडे यांची विशेष ‘संगीत रजनी’ दिनांक १८ मार्च,रोजी, रात्री ८.३० वा बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्शन क्रिएशन्स’ आणि ‘शु-हर्ष इंटरप्राइझेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भक्ती, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
या संगीत रजनीत पं. अजितकुमार कडकडे आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि कालातीत रचना सादर करणार आहेत. ‘करा हो’, ‘गुरूचा जयजयकार’, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’, ‘ओम श्री साईबाबा’, ‘गण गण गणात बोते’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘ओम नमः शिवाय’ यांसारख्या भक्तिमय गीतांचा आनंद रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9769977380
gajanantupe2@gmail.com




