नागपूर जिल्हा मौदा

भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करा – ज्ञानेश्वर दादा रक्षक

मौदा येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न

मौदा:- अखिल भारतीय कुणबी समाज शाखेतर्फे मौदा येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराज यांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत ज्ञानेश्वर दादा रक्षक यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून संत तुकडोजी महाराज साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक तसेच डॉ. व्यंकटेश पोटफोडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मौदा नगरपंचायत चे अध्यक्ष राजाभाऊ तिडके उपाध्यक्ष शुभम तिघरे, नगरसेवक सुनिल सावंग, सचिन काळमेघ,नगरसेविक रंजना धनजोडे, प्रियंका काळमेघ, दामिनी साठवणे ,शिवसेना तालुकाप्रमुख नितेश वांगे ,माजी सभापती स्वप्निल श्रावणकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे,कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा चे संचालक राजेंद्र लांडे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठवकर, जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, खरेदी विक्री संघांचे सभापती युवराज ठाकरे,माजी उपनराध्यक्ष राजेश निनावे, डॉ. अनिल बोरकर,माजी प्राचार्य वामनराव मोहतुरे, संजय गिरडे, ईश्वर डहाके व मोट्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *