अकोला

LPG व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या मागणीसाठी हॉटेल व्यवसायिक रस्त्यावर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

अकोला – अकोला जिल्ह्यात हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट केटरिंग विद्यार्थी मेस तसेच वाईन बार मध्ये लागणाऱ्या व्यवसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा मागील आठ ते दहा दिवसापासून पूर्णपणे ठप्प झाला आहे त्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आला आहे. आज हॉटेल रेस्टॉरंट मेस स्वीट मार्ट कॅटर्स वाईन बार संचालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून माननीय जिल्हाधिकारी यांना समस्या निराकरणाचे निवेदन सादर केले.

माननीय जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर व्यवसायिक गॅस सिलेंडर पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचं आश्वासन दिले. सध्या लग्नसरायची वेळ असल्यामुळे केटरिंग व्यावसायिक यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे ज्याच्या घरी लग्न आहे त्यांनी लोकांना जेवणाचे निमंत्रण दिलेले आहे तसेच लग्नामध्ये गॅस सिलेंडर नसल्यामुळे केटरिंग व्यवसाय का समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

अकोला शहरात मोठ्या प्रमाणात शिकवणीसाठी बाहेरगावचे विद्यार्थी राहतात त्यांच्या जेवणाचा प्रश्न सुद्धा मेस संचालकांसमोर निर्माण झाला आहे तसेच हॉटेल रेस्टॉरंट आणि वाईन बार मधील काम करणाऱ्या बाहेर गावच्या कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे जेवण तयार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच शासनाच्या 13/03/2026 रोजी च्या शासन परिपत्रकात प्राधान्य क्षेत्रात कुठेही हॉटेल रेस्टॉरंट केटरिंग मेस आणि वाईन बार यांचा उल्लेख नसल्यामुळे सिलेंडर मिळण्याची शक्यता सुद्धा मावळली आहे अशा परिस्थितीत हॉटेल रेस्टॉरंट कॅटर्स स्वीट मार्ट वाईन बार विद्यार्थी मेस या बंद झाल्यास याचा थेट परिणाम शेतकऱ्यांपासून भाजी विक्रेते लहान-मोठे कारागीर कर्मचारी किराणा व्यवसायिक या सर्वांवर होणार आहे तरी शासनाने त्वरित व्यवसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली

यावेळी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल वाईन बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर श्रीकांत देशमुख जसपाल सिंग नागरा प्रशांत देशमुख ओम प्रकाश गोयंका दिपक वोरा कृष्णकुमार राठी भावेश खिलोसिया श्रीराम पांडे भूषण मेहता सतीश खत्री केतन शहा प्रवीण चोपडे ऋषिकेश भिरड पिंटू भाऊ देशमुख पिंट्टू भाऊ गोसावी नरेंद्र अग्रवाल दीपक जूनगडे शैलेश खत्री श्रीकांत खेडकर संजय सिंग सिसोदिया गुड्डू ठाकूर सचिन अग्रवाल गौरव नागपाल गजानन खंडेलवाल धनु भाई खिलौसिया अश्विन भाई खेलोसिया विकी रोकडे सचिन पराठा बबलू चायनीज यांच्यासह मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उपस्थित होते

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *