‘दादा’ पर्मनंट नॉट रिचेबल
दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हरपले आहे. “दादा” या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी ‘दादा’गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही…
असेही दादा
(श्रीकृष्ण चांडक)महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर अजित दादा स्वर्गाच्या वाटेने गेले. त्यांची शिस्त, त्यांचा लोकसंग्रह, स्पष्टवक्तेपणा वगैरे वगैरे सर्वांनाच ठाऊक आहे, किंबहुना तो प्रसिद्ध आहे. पण दादा व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांनी कुणाकुणावर कशीकशी माया केली. याची जी काही माहिती आमच्या जवळ…
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ हरपला!
महाराष्टाच्या राजकारणाची कधीही न भरुन निघणारी हानी आज झाली. अजितदादांचे निधन ही बातमी कुणालाही खरी वाटत नाही. परंतु स्पष्ट आणि परखड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, यावर विश्वास ठेवावाच लागेल. पण दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवलं ही सत्य वस्तुस्थिती आहे. उमदा, स्वच्छ…
सेवानिवृत्तीनंतरही समाजाचे शिल्पकार, प्रल्हाद होगे पाटील
माणूस कितीही मोठा झाला, कितीही पदं भूषवली, तरी त्याच्या मनाच्या कुठल्यातरी hकोपऱ्यात गावाची ओढ कायम जिवंत असते. लहानपणीची माती, त्या मातीतील माणसं, बोलीभाषेचा गोडवा आणि ओळखीची नाती,या सगळ्यांची एक अदृश्य दोरी आयुष्यभर आपल्याला गावाकडे ओढत राहते. अनेकांच्या मनात एक सुप्त…
प्रजेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारताच्या प्रजेला आज प्रजासत्ताकाच्या शुभ दिनी आपल्या देशाचे नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळात राज-महाराजे होते, इंग्रज होते. पण आजच्या दिवशी १९५० साली आपण खऱ्या अर्थाने मूलभूत अधिकारांसह या देशाचे स्वतंत्र नागरिक झालो. त्यानंतरच्या वर्षांमध्ये भारताने अनेक प्रगतीची पावले उचलली….
हायकोर्टाचा सुपर झटका
न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आणि मनसुब्यांचा इशारा दिला की, जग मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आरोपींची नांगी आपोआप सैल होते. त्यानंतर तो आरोपी विनाशर्त कसा शरण येतो त्याचे एक वेगळे उदाहरण आज दिसले आहे. काल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांच्या एकलपीठाने…
विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आरशातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे अंधश्रद्धेविरोधात विवेकी समाज घडवण्याचे ध्येय समोर ठेवले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन, मुठभर कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी एक वैचारिक चळवळ उभी केली. विवेकाच्या आरशात समाजाने स्वतःकडे पाहावे, अंधश्रद्धेची…
मोदीजींचे ‘बॉस’
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीकधी इतके नम्र होतात की, ज्यामुळे नम्रताही लाजून चूर होऊ शकते. अशा जगात कोणी बॉस आहे असे म्हटले तर लोक त्याला वेड्यात काढतील. अरे पण वेड्या लोकांनो, खुद्द मोदीजींनीच हे जाहीर केले आहे की भारतीय जनता…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार – गजानन मोरे
मोठ्या परिश्रमातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उत्तम गुण मिळवूनही, केवळ प्रवेश परीक्षांचे जटिल नियम व किचकट पद्धतीविषयी अज्ञान असल्याने अनेक विद्यार्थी आपले उत्तम भविष्य घडविण्यापासून वंचित राहू शकतात. ही बाब जेव्हा गजानन मोरे यांनी हेरली, तेव्हा समुपदेशनाद्वारे (काउंसलिंग) विद्यार्थी व…
महाराष्ट्राची महाउदारता
महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले, असे कधीकाळी कविवर्य सेनापती बापट यांनी म्हटले होते. त्यांच्या याच ओळीला साकार करणारी एक भाषिक अधिसूचना महाराष्ट्राच्या पालघर जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबर गुजराती भाषेचा उपयोग करावा असा आदेशच काढलेला आहे. म्हणजे…









