राजकारण

दिल्लीच्या दरबारी कुणाची लागणार वर्णी? भाजपच्या यादीत ‘हे’ दिग्गज; तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत मोठा निर्णय!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या रणांगणाची जोरदार तयारी सुरू असून, महायुतीमधील जागांचे समीकरण आता जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर कमिटीच्या १२ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या खलबतांमध्ये उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या…

अवकाळीच्या तडाख्याने बळीराजा कोलमडला! मुंडेंच्या आक्रमकतेपुढे सरकार नमले; बांधावर पंचनाम्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी,मुंबई: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. राज्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे…

समृद्धीवर सुविधांची वानवा अन् पुतळ्याची फक्त घोषणाच; उपसभापतींनी प्रशासनाला सुनावले खडे बोल, आता द्यावे लागणार व्हिडिओ पुरावे!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्धी महामार्गावरील प्रस्तावित पुतळा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आज प्रशासनाची मोठी कोंडी झाली. “केवळ फाईलींवर उत्तरं देऊ नका, तर महामार्गावर नेमकं काय सुरू आहे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगच सभागृहात सादर करा,” अशा कडक…

​१,१५० कोटींचा ‘तो’ कागद आणि जन्माआधीचा व्यवहार; शिंदेंच्या खासदाराभोवती भ्रष्टाचाराचा विळखा?

विशेष प्रतिनिधी:​छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील जमिनीच्या मोबदल्यावरून राज्याच्या राजकारणात एक अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर १,१५० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणातील ‘ट्विस्ट’ने सर्वांच्या भुवया उंचावल्या…

आमदाराचा ‘गेम’ करण्याची बिश्नोई गँगची सुपारी? १० कोटींच्या कॉलने खळबळ; वडेट्टीवारांनी सभागृहात ऐकवला दहशतीचा पाढा!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीचे सावट आता थेट महाराष्ट्राच्या विधीमंडळापर्यंत पोहोचले आहे. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे १० कोटींची खंडणी मागण्यात आली असून, ‘ठार मारू’ अशा धमकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या…

मालेगावात सोमय्यांचा ‘डर्टी डझन’चा नवा अंक? बनावट कागदपत्रांच्या विळख्यात कोण अडकणार?

मालेगाव: भाजपचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज अचानक मालेगावात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आधी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर थेट अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमय्या यांनी धाव घेतल्याने, मालेगावातील काही बड्या नेत्यांचे…

जपानी मुलीचा तो व्हिडिओ आणि ‘मराठी’चा वार; राज ठाकरेंनी मोहन भागवतांना घरचा अहेर देत नक्की काय सुनावले?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:परकीयांना जे सहज उमजते, ते स्वकीयांना का समजत नाही? असा तिखट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका जपानी तरुणीचा मराठी शिकतानाचा व्हिडिओ शेअर…

‘लक्ष्मी दर्शना’चे गंभीर आरोप अन झिरवाळांच्या राजीनाम्याची डरकाळी; विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज नेमकं काय शिजतंय?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज राजकारण्यांच्या घोषणाबाजीने नाही, तर गंभीर आरोपांच्या धुराळ्याने वातावरण कमालीचे तापले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी एकत्र येत रणशिंग फुंकले असून, थेट राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे….

विधीमंडळात ‘मुनगंटीवार’ वादळ! एकाच सदस्याची ३९ विधेयके; संसदीय इतिहासातील ७० वर्षांचा रेकॉर्ड मोडला?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवार यांनी तब्बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ मांडून एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो भविष्यात कोणालाही मोडणे कठीण जाईल. विधीमंडळाच्या…

रवींद्र चव्हाणांच्या ‘मिशन महाराष्ट्र’ची नवी फळी जाहीर; कोणाचे पंख कापले अन कोणाला मिळाली उभारी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर आपल्या टीमची घोषणा करत राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेली अनेक महिने लांबणीवर पडलेल्या या निवडींमध्ये अनुभवी नेत्यांना सामावून घेतानाच, आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून अनेक ‘सरप्राईज’…