अजितदादांच्या अपघाताचे गूढ दिल्लीच्या वेशीवर; रोहित पवारांचा ‘तो’ खळबळजनक आरोप आणि बड्या मंत्र्याची खुर्ची धोक्यात?
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी:बारामती विमानतळावर २८ जानेवारी रोजी झालेल्या ज्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत झाला, त्या घटनेने आता पूर्णपणे वेगळे वळण घेतले आहे. हा केवळ एक अपघात नसून त्यामागे अत्यंत मोठा आणि खोलवर रचलेला ‘घातपात’ असल्याचा…
सातासमुद्रापार दुमदुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष; अंदमानच्या किनाऱ्यावर रामदास आठवलेंच्या उपस्थितीत शिवगर्जना!
पोर्टब्लेयर | विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि विचारांचा वारसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो आता सातासमुद्रापार अंदमान-निकोबार बेटांवरही मोठ्या दिमाखात पोहोचला आहे. ऐतिहासिक पोर्टब्लेयर (दीपनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जयंती महोत्सव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…
फॉर्म १६ आणि २६एएस इतिहासजमा होणार? १ एप्रिलपासून प्राप्तिकराचे नियम आणि फॉर्म्समध्ये मोठे बदल
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी आगामी १ एप्रिलपासून मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार ‘आयकर कायदा २०२५’ लागू करण्याच्या तयारीत असून, यामध्ये अनेक दशकांपासून परिचयाचे असलेले प्राप्तिकराचे फॉर्म्स आणि त्यांचे क्रमांक कायमचे बदलणार आहेत. विशेषतः…
राजकीय गुपित की सत्तेचा नवा ‘गेम’? फडणवीसांच्या लागोपाठच्या दिल्ली वाऱ्यांनी विरोधकांची झोप उडवली!
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीवारी आणि थेट हायकमांडच्या महत्त्वाच्या नेत्यांशी खलबतं… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धावपळीने राज्याच्या राजकारणात सध्या संशयाचे आणि कुतूहलाचे काहूर माजवले आहे. “दौरा सदिच्छा होता,” असे वरवर सांगितले जात असले तरी, ज्या…
मोदी सरकारच्या ‘कामगार धोरणा’विरुद्ध उद्या देशव्यापी एल्गार; काँग्रेसचा ‘भारत बंद’ला जाहीर पाठिंबा!
विशेष प्रतिनिधी, मुंबई:केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविरुद्ध आता संघर्षाची ठिणगी पडली असून, उद्या गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मुळे संपूर्ण देश ठप्प होण्याची शक्यता आहे. देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी या अन्यायी कायद्यांविरोधात आक्रमक पवित्रा…
चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत प्रवेश :राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ
संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बोलताना राहुल गांधी यांनी कारवा पत्रिकेमध्ये प्रकाशित माजी लष्कर प्रमुख एम. एम.नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचे काही अंश वाचण्यास सुरुवात केली आणि वक्तव्य केले की चिनी सैनिक भारतीय हद्दीमध्ये शिरलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संरक्षण मंत्री…
अजित पवार यांच्या दुःखद निधनावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे योगदान उल्लेखनीय, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे…
महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
नवी दिल्ली, 25 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार…
महामार्गांचे काम सुरू असताना टोलची ‘लूट’ थांबणार! केंद्राचा मोठा निर्णय; ७० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर
रस्त्यांचे विस्तारीकरण पूर्ण होईपर्यंत खिशाला दिलासा; मंत्रालयाने टोल नियमावलीत केली मोठी सुधारणा नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी:राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना खराब रस्ते, बांधकाम आणि वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महामार्गाचे रुंदीकरण किंवा बांधकामाचे…
तिजोरीतला जोर, प्रचाराची धार… दिल्लीतील आर्थिक कागदपत्रांनी कोणते नवे संकेत दिले?
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:राजकारणात व्यासपीठावर दिसते भाषणं आणि घोषणा, पण सत्तेची खरी ताकद मोजली जाते ती आकड्यांवर. Bharatiya Janata Partyने भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ताज्या आर्थिक अहवालामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या देणग्या, हजारो कोटींचा खर्च आणि…










