मुरबाड तालुक्यातील माळ येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी वायरमनचा मृत्यू; दुरुस्तीचे काम करताना विजेचा जबर शॉक
मुरबाड, दि.२१,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील माळ सुकाळवाडी भागात एका आदिवासी वायरमनचा विजेचा जबर शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी वायरमन चिमा जानू पारधी हे माळ एसटी बस स्टॉपजवळील लाईट डीपीवर दुरुस्तीचे काम करत होते. येथे लाईट नसल्यामुळे…
फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्यात विषारी औषध ओतल्याने नदीपात्रात मृत मासे तरंगले
मुरबाड, दि.१७,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट शेजारील नदीत पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत…
मुरबाडमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; शासकीय रुग्णालयातील सुविधा अभावामुळे जीव गेला
मुरबाड, दि.१५,प्रतिनिधी,मुरबाड तालुक्यात गावात महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेला मुरबाड येथील शासकीय रुग्णालयात आणली असता अपुऱ्या सुविधांमुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मुरबाड तालुक्यातील चिखले गावात भारती नारायण…
काळू धरणाच्या भूसंपादनासाठी हालचालींना वेग; धरण क्षेत्रातील जमिनीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मुरबाड, दि.१०,प्रतिनिधी,काळू धरण होण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून धरणक्षेत्र भागांची पाहणी करण्यात आली आहे. याअगोदर ग्रामस्थांनी काळू धरण न होण्यासाठी विरोध दर्शवला होता. याबाबत विविध संघटनांकडून आंदोलने ही करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी…
मुरबाड पोलिसांनी घरफोडी सह सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; आरोपींकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुरबाड, दि.८,प्रतिनिधी:मुरबाड शहरातील माऊली नगर विभागात व आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्या समोरील बिल्डिंग मध्ये दि.२४ जाने रोजी भरदिवसा घरफोडी करून चोरांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम ३६२५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली…
ठाणे जिल्हा कर्जमाफीतून वगळला;बँकांनी वसुलीचा तगादा लावल्याने शेतकरी अडचणीत
मुरबाड,दि.६,प्रतिनिधी:विद्यमान सरकारमधील माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीच्या निर्णयातून वगळल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने बँकांना थेट कर्जवसुलीचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. भाताचे कोठार” म्हणून ठाणे जिल्ह्यात मुरबाड आणि शहापूर…
टोकावडे ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट
मुरबाड, दि. ६, प्रतिनिधी:ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी, बुधवारी सायंकाळी ८ वाजता टोकावडे ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांना प्रत्यक्ष…
मुरबाडमध्ये अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
मुरबाड,दि.५,प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ही बातमी समजताच देशभर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते, कार्यकर्ते यांनी मुरबाड शहर बाजारपेठ बंद ठेवून त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. दि.४…
रेशनिंगचा काळाबाजार चव्हाट्यावर:टोकावडे पोलिसांनी रेशनिंगच्या तांदळाचा ट्रक पकडला
मुरबाड,दि.१,प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी…
जिल्हा परिषद ठाणे: माळ गटात १० वर्षांपासून नागरिक व विद्यार्थ्यांचा दगड-गोट्यातून प्रवास
मुरबाड, दि.२०,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल भागात काही गावांमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे, स्थानिक नागरिकांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. गेल्या १०–१५ वर्षांपासून माळ जिल्हा परिषद गटातील माळ, जांभूळवाडी, वडाचीवाडी,…










